शुभ सकाळ

Home / Good Morning / शुभ सकाळ

सुंदर काय असतं

जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं…
ते मन सुंदर…

चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात…
ते विचार सुंदर…

आणि कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते…
ते नाते सुंदर…!

|| शुभ सकाळ ||
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..

|| शुभ सकाळ ||
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…

|| शुभ सकाळ ||
”निवड” ”संधी” आणि ”बदल” या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. “संधी” दिसता “निवड” करता आली तर “बदल” आपोआप होतो.
“संधी” समोर दिसुनही ज्याला “निवड” करता येत नाही त्याच्यात कधीच “बदल” घडत नाही….

|| शुभ सकाळ ||
आपल्याला जे लोक आवडतात,
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा….
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,
आयुष्य खूप सुंदर आहे
आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!

|| शुभ सकाळ ||
“मोगरा” कितीही दुर
असला तरी “सुंगध” येतोच,
…तसेच
“आपली माणसे” किती ही दुर
असली तरी “शुभ सकाळी त्यांची आठवण येतेच”…
शुभ सकाळ!!

|| शुभ सकाळ ||
परिवारा पेक्षा_श्रेष्ठ_पैसा_नाही
वडीलां पेक्षा_श्रेष्ठ_सल्लागार_नाही.
आई पेक्षा_श्रेष्ठ_जग नाही
भावा पेक्षा_श्रेष्ठ_भागीदार_नाही
बहिणी पेक्षा_श्रेष्ठ_शुभचिंतक_नाही
मित्रां_शिवाय_आयुष्य_नाही.
म्हणून परिवार शिवाय “जिवन” नाही.

|| शुभ सकाळ ||
विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.

|| शुभ सकाळ ||
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते.
शुभ प्रभात..

|| शुभ सकाळ ||
मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण….
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं…
जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं …

|| शुभ सकाळ ||
सोनेरी ग्रहावर सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी रंग,
सोनेरी रंगाच्या सोनेरी शुभेच्छा फक्त तुमच्यासाठी.!!!

|| शुभ सकाळ ||